
बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन येथे दि 14 ऑक्टोंबर सायंकाळी सुमारे 5:30 वाजता शांतता समिती बैठकीला सुरुवात झाली होती. शांतता समितीच्या अध्यक्ष स्थानी ठाणेदार सुजाता बनसोड ह्या होत्या. शांतता समितीच्या बैठकीस, बिटरगांव ( बु ) पो. पाटील, सोनदाभि, मोरचंडी, एकांबा, जेवली, मथुरा नगर, पिंपळगाव, पोलीस पाटील व दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी व या प्रत्येक गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. येणाऱ्या काही दिवसातच नवरात्र व धम्मचक्र परिवर्तन दिन दरवर्षी एकत्रित येत असते ते आपण सर्वांनी अतिशय शांततेत व संयमाने एकोप्याने साजरा करावा. वेळेचं भान राखून आपल्या भारतीय संस्कृतीचे उत्सव येकोप्याने साजरे करावे. जो कोणी प्रशासनाचे उल्लंघन करील त्यांच्यावर आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही . असे ठाणेदार सुजाता बन्सोड मॅडम यांनी संपूर्ण दुर्गा उत्सव मंडळांना सांगितले. सर्वांनी ठाणेदार सुजाता बनसोडे मॅडमच्या विचाराशि सहमती दर्शवली आम्ही गावकरी मंडळ कोणतेही अपकार्य करणार नाही वेळेचं भान राखून कायदा सुव्यवस्था कायम ठेवील असे दुर्गा उत्सव मंडळ व नागरिकांनी बोलले होते. व शांतता समिती बैठकीची सांगता करण्यात आली. आभार प्रदर्शन. बिट जमादार गजानन कणाते यांनी केले होते,
