दानपेटी फोडणाऱ्यां तिघांना ठोकल्या बेड्या

रावेरी येथील पुरातन काळातील सीता माता मंदिरामध्ये दिं. २५ मार्च रोजी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश करून मंदिरामध्ये असलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यामध्ये ठेवून असलेले अंदाजे दहा हजार रुपये चोरी केले होते. या चोरीचा छडा लावत राळेगाव पोलिसांनी तपास चक्र चोरट्याच्या दिशेने फिरवत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवीत गुन्ह्याचा पर्दाफाश केला
याबाबत नामदेव लक्ष्मणराव काकडे वय ६१ वर्ष राहणार रावेरी तालुका राळेगाव यांनी पोलिसात तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी गावातील संशय असलेले इसम निशिकांत परसराम थुटूरकर वय २७ वर्ष सौरभ दिलीप बोरकुटे वय २३ वर्ष विशाल मोरेश्वर डायरे वय २२ वर्ष राहणार रावेरी तालुका राळेगाव यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली यावरून आरोपी यांना अटक करण्यात आली असून या आरोपीकडून चोरी केलेले पैसे जप्त करण्यात आले आहे.