


वरोरा तहसील कार्यालयात असेलल्या टॉवर वर चढत याआधीही केले होते आंदोलन
पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनी विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीवर कारवाई करा
अन्यथा आंदोलनाचा दिला होता इशारा
वरोरा— वरोरा नगर परिषदेद्वारे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा करार विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीसोबत करण्यात आला. कंपनीच्या निष्काळजी व बेजवाबदारपणामुळे मालवीय वार्डातील एका वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवून या कंपनीला काळ्या यादीत टाका अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते वैभव भैय्यासाहेब डहाणे यांनी निवेदनातून दिला होता .
वरोरा शहरात दि.५जुलै रोजी पूर्वेष वांढरे रा. मालवीय वार्ड, वरोरा या बालकाचा विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीद्वारे पुरविण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे मृत्यू ओढवला तर काही बालकाना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते. नगर परिषद द्वारे विदर्भ मल्टी सर्विसेस या कंपनीला शहरात नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे, विहिरीचा गाळ काढणे, कुपनलिका (बोअर)यांची देखभाल व दुरुस्ती करणे, तसेच तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा करीने शक्य नसल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अशा विविध अटी शर्तीद्वारे पाच लाख रुपये प्रति महिन्याप्रमाणे देण्याचा करार करण्यात आला होता असे असतानाही मालवीय वार्डातील पूर्वष वांढरे या बालकाचा दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने मृत्यू ओढविला ही इतकी गंभीर घटना घडून गेल्यावरही नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला पाझर फुटला नाही उलट या कंपनीवर कोणतीही उचित कारवाई न करता प्रशासकीय अधिकाऱ्याने या कंपनीला पुढील तीन वर्षासाठी हे काम ७ लाख रुपये प्रति महिना प्रमाणे वाढवून दिले आहे या आधी हे काम एक वर्षासाठी पाच लाख रुपये प्रति महिना प्रमाणे देण्यात येत होते , मालाविय वार्डात इतकी मोठी घटना घडूनही नगरपरिषद प्रशासनाला राग आलेला नाही कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता उलट कंपनीला पाठीशी घालून कंपनीसोबत तीन वर्षाचा करार केलेला आहे . नगरपरिषद प्रशासनाला अजूनही किती निर्दोष लोकांचे जीव हवे आहेत असा प्रश्नही आता निर्माण झालेला आहे. नगर परिषदेच्या बेजबाबदार कृतीमुळे वरोरा शहरातील नागरिकास संभ्रम प्रशासनाबद्दल तीव्र चीड निर्माण झालेली आहे .तेव्हा या कंपनीवर रीतसर कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत पावलेल्या बालकाच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मोबदला देण्यात यावा अन्यथा या सर्व प्रकारावर प्रशासन आणि कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी ताकीद सामाजिक कार्यकर्ते वैभव भैय्यासाहेब डहाणे यांनी निवेदनातून मागणी केली होती.
