

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
पवनार ते सेवाग्राम हमदापुर रोडचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे, रोड च्या भूसंपादन मध्ये शेत जमीन, खाली प्लॉट,रोड लगत असलेली घरे हि गेले. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना भूसंपादित जमिनीचा निवडा न झाल्या मुळे मोबदला मिळाला नसल्याने पैसे कधी मिळेल हो साहेब अशी आर्त हाक लावल्या जात आहे. सेवाग्राम पासून ते पवनार पर्यंत जवळपास ६५ % रोडचे काम पूर्ण झाले असून ठिक ठिकाणी रोड बाकी सोडण्यात आला आहे, तर काही ठिकाणी मोठ मोठे खडे पडले आहे पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने पावसाचे पाणी खड्यात साचून राहिल्यास दुचाकी धारकांना त्या खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात ही वाढत चालले आहे मात्र कंत्राटदार या कडे अक्ष्यम्य पने दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना याचा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे,
नियमानुसार रोड चे काम सुरू झाल्यास वाहन धारकानसाठी रोड च्य बाजूनेच डांबर रोड चे कचे काम करणे गरजेचे असते ज्या मुळे वाहन धारकांना रोडचा त्रास होणार नाही अथवा अपघात होणार नाही याची काळजी घेणे हे कंत्राटदाराचे काम असते रोड चे काम सुरू असल्यास त्या ठिकाणी लाल अथवा पिवळे रेडियम स्टिकर लावून फलक दर्शविणे महत्वाचे असते मात्र असे कुठेही दिसून येत नसल्याने कंत्राटदार मनमर्जी प्रमाणे काम करत आहे
एक साईड रोडचे काम अपूर्ण असताना दुसऱ्याहि बाजूने रोड उखरून ठेवला आहे.
परिणामी वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आहे.
पवनार पासून हाकेच्या अंतरावर सेवाग्राम रुग्णालय आहे या रोड ने नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते नागपूर साठी हि इमार्जेशी पेशंट न्यायचे असल्यास रुग्ण वाहिकाना सुधा तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मात्र या कडे कुणालाही लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
गेल्या एक वर्षापासून रोडचे सुरू आहे काम
मागील एक वर्षापासून पवनार ते सेवाग्राम रोडचे काम कंत्राटदरांकडून सुरू केले आहे ठीक ठिकाणी रोडचे एक साईड काम बाकी असताना दुसरीही बाजू का उखरण्यात आली.
बऱ्याच ठिकाणी नुसता रोड उखरुन ठेवला आहे अनेक ठिकाणी जीव घेणे खडे पडले आहे त्या मुळे सातत्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे
सेवाग्राम पासून ते पवनार पर्यंत एक साईड सिमेंट रोड तयार करण्यात आला असून दुसऱ्या साइडला कच्च्ये काम करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी ही सुद्धा रोड मधे गेल्या आहे हा सगळा प्रकार एक वर्षीपासून सुरू असून अद्याप पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला का दिला गेला नाही….??
प्रशासनाचा वेळ काढू धोरणा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे मात्र या कडे लोकप्रतिनिधी हि झोपेचे सोंग घेऊन बसले असल्याचं दिसून येत आहे.
पवनार गावा जवळ काम येवून ठेपले असल्याने नागरिक संभ्रमात
गावाच्या अगदी काही अंतरावर रोडचे काम येवून ठेपले आहे दोन वर्षा पूर्वी रोड लगत जमीन, खाली प्लॉट, घर असलेल्या नागरीकांना नोटीस दिल्या गेले होते परंतु तेव्हा पासून आता पर्यंत प्रशासना कडून नागरीकांना काहीही माहिती दिली नसल्याने रोड लगत असलेले प्लॉट धारकांमधे संभ्रम निर्माण होऊ लागला असल्याने आपले घर किंवा मकान किती जाणार या मुळे पवनार वासी धास्तावले आहे तरी जिल्हाधिकारी वर्धा, भूसंपादन उप जिल्हाधिकारी वर्धा, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ आय अधिकारी वर्गानी लक्ष देणे गरजेचे आहे.
