ट्रायबल फोरम राज्य समन्वयक पदी बाळासाहेब तिरानकर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

आदिवासी समाजाच्या सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवून समाजासाठी नेहमीच धावून जाणारे वित्त विभाग मंत्रालय मुंबई येथील सेवानिवृत्त सहसंचालक वित्त व लेखा सेवा वर्ग -१ वरीष्ठ, महाव्यवस्थापक वित्त, बाळासाहेब तिरानकर यांची ट्रायबल फोरम महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम यांनी केली आहे.

बाळासाहेब तिरानकर हे कवी,लेखक व गितकार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए.मराठी अभ्यासक्रमात त्यांच्या काही कवितांचा समावेश आहे. ते अखिल महाराष्ट्र आदिवासी लोकविकास मंच मुंबईचे संस्थापक अध्यक्ष असून संविधान सैनिक संघ मुंबईचे राज्य समन्वयक आहे.आदिवासी समाजाच्या आर्थिक विकासासाठी त्यांची तळमळ व प्रामाणिक प्रयत्न आहे.बाळासाहेब तिरानकर यांची ट्रायबल फोरम राज्य समन्वयक पदी निवड झाल्यामुळे मुंबई, कल्याण, ठाणे परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.