

दिनांक 30 ऑगस्ट 2023. सोनामाता हायस्कूल चहांद येथे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राखी निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली, यामध्ये वर्ग पाच ते दहा च्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्ण सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी घरगुती वस्तूंपासून तसेच टाकाऊ पदार्थांपासून अतिशय सुबक व सुंदर अशा राख्या तयार केल्या. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे कौतुक केले.तयार केलेल्या राख्यांचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तसेच रक्षाबंधन सणाचे निमित्त साधून शाळेतील मुलींनी मुलांना तसेच सर्व शिक्षकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच निसर्ग सुद्धा आपले रक्षण करतो, ही जाणीव ठेवून शाळेतील वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे मुलाचे सहकार्य लाभले.
