शहरात घरफोडीचे सत्र सुरू,दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

 

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून चोरीला उधाण आल्याचे दिसून येत आहे, त्याचेच प्रत्युत्तर म्हणजे काल सायंकाळच्या वेळेस दोन लाख नऊ हजार शंभर रुपयाच्या मुद्देमाल चोरट्यांनी घर फोडून चोरून नेल्याचे निदर्शनात आले आहे, राळेगाव शहरात गेल्या काही दिवसापासून दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे, गणेश नगर येथे काही दिवसा अगोदर घरफोडीचा असफल असा प्रयत्न करण्यात आला त्यामध्ये तीन घरांच्या फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला पण नगरातील नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळाला तसेच काल रात्री निलेश चंद्रभान किनाके राहणार राधाकृष्णनगरी राळेगाव यांचे घरी काल सव्वा नऊच्या दरम्यान दिनांक 23/0 2/ 2023 रोजी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे दाराचे कडे कोंडा तोडून घरात प्रवेश करून हॉलमध्ये असलेल्या लोखंडे अलमारी मधील सोन्याचे दागिने व नगदी असा एकूण दोन लाख 9 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला अशी फिर्याद काल पोलीस स्टेशन राळेगाव येथे दाखल करण्यात आली पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस स्टेशन करीत आहे.