
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गोंडवाना गणतंत्र पार्टी चा सामाजिक आणि राजकीय हेतु चे विचार मंथन व्हावे यासाठी “‘ कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा “‘ पाथ्रड येथे आयोजित केला होता.या मार्गदर्शन मेळाव्यात प्रमुख उपस्थिती मान्यवर मा.बळवंतराव मडावी, प्रदेश कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. – – जिल्हा स्तरीय मार्गदर्शन मेळाव्याचे महत्त्वाचे विषय हिवाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेवर मार्गदर्शन करण्यात आले जिल्ह्यातील आदिवासी च्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका, शेतकरी आणि शेतमजूर, महीला चे प्रश्न, भुदान जमीन पट्टे मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे , केंद्र सरकार ने कापूस आयात थांबवावी , आणि वंचित शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान लवकर देण्यात यावे , आणि पुरग्रस्त लोकांना शासनाने मदत करावी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले होते -. – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अजुन ही आदिवासी समाज सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहे, महिला सक्षमीकरण करण्यासाठी राजकीय पक्ष पुढाकार घेऊन महिला बचत गट निर्माण करतं आहे हीच भूमिका गोंडवाना गणतंत्र पार्टी घेणार आहे आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले आहे.या जिल्हा स्तरीय मार्गदर्शन मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष, जनरल कार्यकारिणी सदस्य महिला जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य तालुका कार्यकारिणी सदस्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन मा.हणुमान टेकाम तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी केले होते यात सहभागी मा विठ्ठल धुर्वे जिल्हा अध्यक्ष मा विजया रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) गणेश आत्राम मा ताराबाई कोटनाके मा जयश्री मेश्राम कलावती ऊईके बादल वाघमारे यांच्या सहकार्याने जिल्हा स्तरीय मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्यात आला होता.
