रिधोरा येथील अंगणवाडी तर्फे पोषण आहार अभियान

किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्य विषय मार्गदर्शन अंगणवाडी सेविका सौ.मीराबाई करपते

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

९ सप्टेंबर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल अंगणवाडी १ व २ तर्फे पोषण आहार अभियान व कीशोरवयीन मुलींना आहार व मार्गदर्शन १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत पोषण महा अभियान राबविण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे रिधोरा येथिल अंगणवाडी १ व २ यांच्या संयुक्त कार्यक्रमाने कीशोरीवयीन मुलींना घेऊन गावात प्रभातफेरी काढण्यात आली व रांगोळी स्पर्धा घेवून आरोग्य विषय मार्गदर्शन करण्यात आले आहे.तर मार्गदर्शन संपताच सर्व मुलींना व अंगणवाडी तिल मुला मुलींना जेवण देण्यात आले होते सदर या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ. मीराबाई पंढरीनाथ करपते, अंगणवाडी सेविका श्रीमती, प्रतिभा राऊत, मदतनीस वंदना पंद्रे, प्रभा आडे व गावातील कीशोरीवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.