उत्कृष्ठ तलाठी म्हणून सुमेध अघम उपविभागीय अधिकाऱ्यांतर्फे सन्मानित

उत्कृष्ठ तलाठी श्री सुमेध भीमराव अघम हे वणी तहसील येथील गणेशपुर साजाचे तलाठी असून त्यांनी आपल्या कार्यकाळात अतिशय उत्कृषटपणे कार्य करीत सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि जनतेप्रती संवेदशीलतेने कर्तव्य बजावण्याचे कार्य केलेले आहे.यांचे काळात गणेशपुर कार्यालयाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच पेरे पाटील यांनी भेट देऊन कामाची दखल सुद्धा घेतली आहे.आपल्या कार्यात सतत कार्यरत प्रामाणिक असलेले तलाठी सुमेध आघम यांना उपविभागीय अधिकारी मा.नितीनजी हिंगोले यांचे हस्ते उत्कृष्ट तलाठी म्हणून आज महसूल दिनी तहसील कार्यालय वणी येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.