
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
ग्रामीण कृषी कार्यानुभव 2022 अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुमेध सुरेशराव भोयर,
चैतन्य नर्सिंग राठोड, प्रणय साहेबराव मून, वैभव रवींद्र गावंडे
यांनी विलास राऊत यांच्या फुल बागेमध्ये जाऊन फुल बागेची पाहणी केली व नुकतीच भेट दिली. यांनी फुलबागेमध्ये येणाऱ्या रोगांविषयी चर्चा केली व फुल बागेचे उत्पादन अधिकाधिक कसे वाढवता येईल याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच हा उपक्रम राबविताना (प्राचार्य) आर.ए. ठाकरे (उपप्राचार्य) एम. व्ही . कडू आणि विषयतज्ञ दिपाली धोत्रे व कार्यक्रम अधिकारी सौरभ महानुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले.
