बरडगाव येथे फिरते अंतरिक्ष महायात्रेचे आयोजन

                 राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर 

   

इस्रो स्पेस सायन्स व विज्ञान भारती विदर्भ प्रदेश आयोजित अंतरिक्ष महा यात्रेचे आयोजन मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे दि. ५ सप्टेंबर२०२३ ला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होत आहे. अंतराळातील अद्यावत माहिती व तंत्रज्ञान विध्यार्थ्यांना या अनुषंगाने मिळणार आहे. नुकत्याच ‘चांद्रयान – ३’ च्या यशस्वी लँडिंग व ‘आदित्य – ११’ प्रक्षेपणानंतर इस्रोच्या या फिरत्या प्रदर्शनीला विशेष महत्व प्राप्त होत आहे. त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन अंतराळ’ या विषयावर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनीय कार्यक्रमाचे उद्घाटन राळेगावचे तहसीलदार मा.अमित भोईटे यांचे हस्ते तर प्रभारी गटशिक्षणाधिकारी मा.देविदास मडावी, पोलीस निरीक्षक मा. रामकृष्णजी जाधव, पोलीस सहाय्यक निरीक्षक मा.निलेश गायकवाड, गटशिक्षणाधिकारी श्रीमती सरलाताई देवतळे, संस्थेच्या अध्यक्षा तथा प्राचार्या डॉ. शितल बल्लेवार, संस्थेचे सचिव तथा राळेगाव नगर पंचायतीचे नगरसेवक डॉ. संतोष कोकुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या आयोजित प्रदर्शनिस परिसरातील सर्व विद्यार्थ्यानी व पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मार्कण्डेय पब्लिक स्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या वतीने
करण्यात येत आहे.