
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
रयत शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सावनेर निवासी पत्रकार विशाल मासूरकर यांची नियुक्ती एका पत्रा द्वारे करण्यात आली आहे.
संस्थापक अध्यक्ष ॲड रविप्रकाश देशमुख यांनी नुकतीच ही नियुक्ती केल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे हे विशेष.
राळेगांव तालुका पत्रकार संघाचे वतीने त्यांचे कौतुक व अभिनंदन केले असून पुढील उज्ज्वल भविष्या साठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत..
