
उमरखेड:- उमरखेड येथिल नगर परिषद मंगल कार्यालय येथे दिनांक 17 रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी महसूल डॉ व्यंकट राठोड , न प मुख्याधिकारी महेश जामनोर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी तसेच उमरखेड उपविभागातील सर्व पोलीस निरीक्षक उपस्थित होते. समाजातील सर्व घटकामध्ये एकोपा वाढीस लागुन शांतता नांदावी या विचाराने पोलीसाच्या वतीने नगर परिषद मंगल कार्यालय येथे दिनांक 17 रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यात उमरखेड पोलीस विभागाने पुढाकार घेतला होता.
रोजा इफ्तार सर्व धर्मिय पार्टीचे आयोजन उमरखेड पोलीस विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांनी केले. तर आभार प्रदर्शन साह्यक पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड यांनी केले.
पोलीस अधिकारी सह परिसरातील सर्व धर्मिय नागरिक या इफ्तार पार्टी मध्ये सहभागी होते. सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याचा निर्धार केला. यावेळी विविध मान्यवरानी आपले मत व्यक्त केले.
यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पत्रकार बाधंव पोलीस पाटिल संघटनेचे पदाधिकारी व शांतता कमेटीचे सदस्य मुस्लिम बांधव सह सर्व पोलीस कर्मचारी व पत्रकार मंडळी उत्साहाने उपस्थित होते. अशा आयोजनाने एकात्मकता प्रेम आणि स्वभावनेचा मोठा संदेश मिळतो असे मत अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी व्यक्त केले. तसेच उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड यांनी बोलताना सर्व धर्मियाना एकत्रित करुन जातीय सलोखा ठेवण्याचे संदेश देण्याचे काम करीत आहोत असे सांगीतले
