
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
पाटणबोरी येथून चार किलोमीटर अंतरावर कवठा येथील शेतकरी प्रमोद सातघरे यांच्या शेतात चरत असलेल्या बैलावर हल्ला केल्याने बैल जखमी झाला सुदैवाने प्रमोद सातघरे हा थोडक्यात बचावला वाघाची दहशत कायम असल्याची किसान सभेतर्फे निवेदन 27 सप्टेंबरला नायब तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदनात नमूद केले, मात्र या वाघाचा अजूनही बंदोबस करण्यात आले नाही .या परिसरामध्ये वाघाची दहशत कायम असून वनविभाग गप्प का बसले असावे असा प्रश्न कवठा व परिसरातील गावांमध्ये उत्पन्न होत असून, शासनाने, वनविभागाने शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन कसे काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.या दहशतीने शेतामध्ये मजूर मिळत नसल्याने शेती व्यवसाय डबगाडीस येण्याचे चित्र दिसत असून ,वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
