.

सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांची विनंतीवरून बदली झाली आणि त्यांचे जागी नव्याने सुखदेव भोरखडे ठाणेदार म्हणून रुजू झाले.
संभाजी ब्रिगेड शाखा वडकीचे वतीने तालुका अध्यक्ष शाहरुख शेख शफी यांनी कार्यकर्ते,गावकरी व समाज बांधवांच्या उपस्थितीत दि.१४/७/२०२४ रविवारला सायंकाळी ७.०० वाजता विजय महाले सर यांचा निरोप समारंभ तर सुखदेव भोरखडे सर यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. प्रमुख पाहुणे विनोद ठक सर यांनी उपस्थितांना बहुमोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले,खाकी वर्दी सर्वांनाच मिळत नाही,नशिबानेही मिळत नाही तर कठोर परिश्रम करून कर्तृत्वाने मिळते.महाले साहेबांनी संविधानीक मूल्ये जोपासली आहे.विशेष अतिथी डॉ.प्रेमदासजी कांबळे साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले आदरणीय महाले सरांनी खैरी गावात मागिल २०/२२ वर्षांपासून बंद असलेली विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि उत्सव सुरू करून बंधुभाव जोपासनेचे बहुमोलाचे कार्य केले आहे.
प्रा.सोमेश्वर केराम सर यांनी आदरणीय महाले सर यांनी आपल्या कारकीर्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली तसेच लोकसभा निवडणुक २०२४ आचार संहिता सुरू असताना रामनवमी, रमजान ईद, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी उत्सव साजरे करण्यात आलेत.या महान अशा उत्सवांना वडकी व परिसरात कोठेही कोठेही गालबोट लागले नाही.सर्वच्या सर्व उत्सव आनंदाने साजरे पार पडले.आदरणीय विजय महाले सरांनी आपल्या कार्यकाळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण केला होता त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.”सद् रक्षणाय – खल निग्रहणाय” ख्याती प्राप्त करून विजयाची पताका घेऊन वडकी येथून यवतमाळ येथे विनंतीवरून बदली झाली आहे.
जामा मस्जिद वडकीचे मौलाना यांनी महाले सरांच्या कार्याचा गौरव करीत नवनियुक्त ठाणेदार मा.भोरखडे सरांना शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती विजय महाले सर म्हणाले, लोकसेवक म्हणून जे करायला पाहिजे ते कार्य प्रामाणिकपणे केले आहे.माझ्या यशस्वी कार्यात नागरिकांचा मोलाचा वाटा आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मी कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही.माझ्या कार्यकाळात कोणत्याही निरपराध लोकांवर अन्याय होणार नाही.”सद् रक्षणाय – खल निग्रहणाय” ही माझी कार्य करण्याची पद्धत असल्याचे अध्यक्षीय भाषणातून सुखदेव भोरखडे नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांनी सांगितले.
जामा मस्जिद वडकीचे वतीने विजय महाले सर यांचा सत्कार आणि सुखदेव भोरखडे सर यांचे स्वागत करण्यात आले तसेच नागरिकांचे वतीने विजय महाले सरांचा सपत्नीक सत्कार करुन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाहरुख शेख शफी यांनी तर आभारप्रदर्शन अजयभाऊ ठमके यांनी केले.
