श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ढाणकी यांच्या वतीने दुर्गा सप्तशती सामूहिक पाठाचे दुर्गोसव मंडळाच्या ठिकाणी आयोजन


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


नवरात्री अर्थातच देवीच्या आराधनेचे व आस्थेचे जणू पर्वणीच. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तीन प्रमुख देवींच्या प्रार्थनेचा काळ. तंत्रज्ञानाने व भौतिकशास्त्राने कितीही प्रगती केली तरी पृथ्वीवरील चराचरात घडणाऱ्या घटनांना कुठेतरी लगाम घालणारी दिव्य शक्ती सूक्ष्म अशा स्वरूपात सतत आपल्या अवतीभवती परिभ्रमण करत असते . अनेक विज्ञानाच्या अभ्यासकांनी मान्य केले आहे. चेतना व शक्तीहीन कोणताही सजीव हा मृतप्राय ग्राह्य धरला जातो. जीवांचे जीव पण हे शक्ती मध्ये असते. या सबल अमोघ शक्तीला हिंदू धर्मात देवतांचे अतिउच्चस्तं स्थान दिले आहे. सृष्टी करता ईश्वरावर आशस्थ होऊन संसाराची दैनंदिन जीवनातील कामे करणारा श्रद्धाळू वर्ग हिंदुस्थानात आहे. त्यामुळे ईश्वर उत्सव इथे घराघरात भक्तीयुक्त पद्धतीने साजरे केले जातात.
ढाणकी शहरात सुद्धा भक्तीयुक्त श्रद्धेचा प्रत्यय येतो आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रा मार्फत प्रत्येक दुर्गा उत्सवाच्या ठिकाणी सप्तशतीचे पाठ आयोजित केले जात आहे.४ ऑक्टोबर शुक्रवारला महिषासुरमर्दिनी मंदिर येथे आयोजन केले होते. असाच सप्तशतीच्या पाठाचे कार्यक्रम दि.५ ऑक्टोबर शनिवार रोजी एक वाजता हनुमान दुर्गोत्सव मंडळाच्या सभामंडपात या पाठाचे आयोजन केले होते. यावेळी सभागृह महिला मंडळींनी व्यापून गेला होता. प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आला. त्यानंतर लगेचच गणेश स्तवन म्हणून पाठाला सुरुवात झाली यावेळी मोठ्या प्रमाणात युवती व माता भगिनींनी या पाठाला हजेरी लावली होती. पाठ करताना ग्रंथ उपलब्ध नसल्यास आयोजकांनी ग्रंथ उपलब्ध करून दिला व ती अडचण सोडवली त्यामुळे भक्तांनी अधिकाधिक लाभ l यावेळी घेतला. नवरात्र उत्सवातील उर्वरित दिवसात विविध दुर्गोत्सवाच्या ठिकाणी पाठाचे आयोजन केले जाणार असून यांचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन पुनम चव्हाण,शीतल वर्मा, प्रशांत पंडीतकर यांनी केले आहे.