कायदा व सुव्यवस्था चोख ठेऊन अवैध धंद्यांना आळा घालणार: वरोरा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार अमोल काचोरे

वरोरा:तीन दिवसांपूर्वी रुजू झालेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी आपला पदभार सांभाळला.शहरातील व ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच अवैध धंद्यांना आळा घालणे तसेच गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे यासाठी उपाययोजना आखणे यावर विशेष भर राहणार असल्याचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोल काचोरे हे अवघ्या 37 वर्षाचे युवा व कार्यशील असे व्यक्तिमत्व असून,ते वरोरा पोलीस स्टेशन वरोरा येथे रुजू होण्यापूर्वी नागपूर सायबर क्राईम ला पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावीत होते.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील टेकाडी मांडवा पोलिस स्टेशन ला पोलीस निरीक्षक म्हणून होते.नागपूर सायबर क्राईम ला असतांना लग्नात चोरी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील सिसोदिया टीम बाबत गुन्हा डिडेक्ट केला.या टीममध्ये तेरा-चौदा वर्षाची मुली राहायची रेजर घालून वर-वधूचे मंचावर बसायचे आणि जे काही सोन्याची अलंकार असतील त्याची चोरी करायचे त्यांना वाटत होते की आम्ही कमी वयाचे अज्ञान असून आमचेवर कार्यवाही होणार नाही परंतु पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी मात्र सदर सिसोदिया टीम चा पर्दाफाश केला.तसेच एका बारमध्ये मर्डर झाला मृतदेह एका कपड्यामध्ये गुंडाळून जामठा स्टेडियम जवळ टाकण्यात आले होते.तो सुद्धा गुन्हा मोठ्या शिताफीने हाताळून मर्डर करणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यात आले होते.तसेच मोक्याचे तीन गुन्हे डिडेक्ट केले असल्याची माहिती देण्यात आली.
वरोरा पोलीस स्टेशन ला रुजू झाले त्यांचे समोर असलेल्या आवाहन च्या प्रश्नाला उत्तर देतांना पोलीस निरीक्षक अमोल काचोरे प्रतिकिया देताना म्हणाले की कायदा व सुव्यवस्था चोख राहावी आणि अवैध धंद्यांना आळा घालणे तसेच गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी विशेष काही उपाययोजना याबाबत माझी प्राथमिकता राहणार असे त्यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी दरम्यान घेतलेल्या मुलाखतीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सादिक थैम,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोहपरे,तालुका सचिव प्रशांत बदकी,संघटक ज्ञानिवंत गेडाम,सदस्य धर्मेंद्र शेरकुरे,कलाशिक्षक परमानंद तिराणीक यांची उपस्थिती होती.