
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ” भाव पुष्पांजली ” म्हणून ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच यांनी ( सखी ) ता. राळेगाव या ठिकाणी केले होते.* आदिवासी दुर्गम भागात सखी या गावातील सर्व सामान्य व्यक्ती म्हणून हुसेन खोरद यांनी चार गावं चे भजनी मंडळ एकत्र करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ” भाव पुष्पांजली ” कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते आणि सहभागी पाहुणे मा श्रीमती आशा काळे, संचालिका ग्राम स्वराज्य महामंच, मा कृष्णा जी भोंगाडे, मा विलास कनाके साहेब, आणि मनिरामजी शाहगड गुरुदेव सेवक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ” भाव पुष्पांजली ” म्हणून सराटी येथिल गुरुदेव सेवा मंडळ यांनी केली आणि सहभाग नवरंग गुरुदेव सेवा मंडळ लोणी गुरुदेव सेवा मंडळ खैरगाव ( कासार ) वारकरी संप्रदाय भजन मंडळ सखी ( महिला ) आणि गुरुदेव सेवा मंडळ सखी ( पुरुष ) यांच्या सहभागाने सामुदायिक प्रार्थना आणि पुण्यतिथी निमित्त ” भाव पुष्पांजली ” अर्पण केली, ग्राम प्रबोधन कार्यक्रमाचे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी ग्राम प्रबोधन करताना, ग्राम गिता, ग्राम सभा, ग्राम स्वराज्य, आणि ग्राम संरक्षण, या विषयावर मार्मिक विवेचन केले आणि आज च्या परिस्थितीत गावा गावात राष्ट्रसंतांच्या विचारांची प्रेरणा, युवक आणि सर्व घटकांना एकत्र करून देण्यासाठी ग्राम चळवळ उभी केली पाहिजे असे स्पष्ट मत अध्यक्षिय भाषनातुन व्यक्त केले. सर्व सहभागी पाहुण्यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजीराव आत्राम लोणी यांनी केले आणि आभार प्रदर्शन शुभम कोवे यांनी मानले या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी लोणी वरुन लक्ष्मण मुस्सी, सुभाष रोठे अरुण सुटी , सखाराम कुडमथे प्रल्हाद बागेश्वर नारायण शेंदरे मोनिका अंबाडेरे, देविका राऊत कल्पना अबांडेरे बबिता अबांडेरे मंजुळा ठाकरे , कल्पना उईके, भागिरती मडावी ज्योती ताई, सुनंदा राऊत , अंकुश राऊत निलेश राऊत, संतोष राऊत, नानाजी घरत बिरबल ठाकरे, संतोष कांबळे, विष्णु ऊईके, श्रीकृष्ण ढोरे देवराव मडावी , गोपाल धानोरकर अरुण राऊत, विठ्ठल बावने दिनेश कोहळे मधुकर नेहारे बंडुजी राऊत , चंद्रभान कोठेकर संजय दुध कोहळे जनाबाई खंडरे राधाबाई कोहळे माया कोहळे प्रविणा नेहारे विमल सोनवणे, ललिता सोनवणे वैशाली दुधकोहळे आशा शेंदरे, सिमा राऊत, अमोल वगारहांडे पद्माकर जुमनाके, रुपेश सोनवणे संजय मेश्राम, महेश कोठेकर आणि सर्व गावकरी महिला पुरुष सहभागी झाले होते
