मणिपूर मध्ये चालु असलेले हिंसक वातावरण आणि महिला अत्याचाराची दखल केंद्र सरकारने घेतली पाहिजे – मधुसूदन कोवे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे असे आपण मानतो आणि मणिपूर राज्य चार महिन्यांपासून हिंसाचाराने पिडीत आहे आणि महिलांवर अमानुष अत्याचार होत आहे मग खरंच राज्य सुरक्षित आहे का? समाजा समाजात द्वेषाची भावना निर्माण होवून एखाद्या राज्यात महिला ची नग्न धिंड काढुण अमानुष अत्याचार करणे ही बाब भारतीय लोकशाही ला कलंकित करण्याची आहे.देशाच्या महामहीम राष्ट्रपती ने लक्षकेंद्रीत केले पाहिजे आणि मनिपुर राज्याच्या राज्यपालांनी सरकार वर कठोर कारवाई केली पाहिजे – – आदिवासी समाजातील लोकांवर होतं असलेला अन्याय हा सरकार ने तातडीने थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत या साठी “‘गोंडवाना गणतंत्र पार्टी “‘ जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी प्रदेश कमेटी कार्याध्यक्ष मा.बळवंतराव मडावी साहेब,मा.मधुसुदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच,मा.कृष्णाजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा.विठ्ठलराव धुर्वे जिल्हा अध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देताना बहुसंख्य गोंडवाना गणतंत्र पार्टी चे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यात प्रामुख्याने मा.होमदेवजी कीनाके साहेब, आर्णी केळापूर विधानसभा प्रमुख मा हरीभाऊ पेंदोर प्रदेश कमेटी संघटक मंत्री मा.प्रल्हादजी सिडाम राज्य अध्यक्ष कोया पुणेम गोटुल समिती ,मा वसंतराव सोयाम, जिल्हा संपर्कप्रमुख,मा विशाल वाघ जिल्हा अध्यक्ष ओ बी सी सेल गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा ज्ञानेश्वर कुमरे कार्याध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा विजयाताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष,( महिला ) गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा राजेंद्र येडमे, जिल्हा उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ मा ताराबाई कोटनाके जिल्हा उपाध्यक्ष मा हर्षल भाऊ आडे जिल्हा संघटक मा जयश्रीताई मेश्राम जिल्हा सचिव मा वर्षा ताई आडे तालुका अध्यक्ष ( महिला ) गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगाव मा मनिषा पुसनाके ,मा अंकुश आतराम तालुका अध्यक्ष केळापूर पंकज तोडासे राहुल वाढवे विनोद कुसराम तालुका अध्यक्ष घाटंजी विष्णू कुळसंगे शहर अध्यक्ष यवतमाळ आणि बहुसंख्येने गोंडवाना गणतंत्र पार्टी चे महिला पुरुष युवक कार्यकर्ते उपस्थित होते.