सेवाकर्तव्य पार पाडून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा सत्कार सोहळा संपन्न

तालुक्यातील दिग्रस येथील तरुण देशाच्या सेवेकरिता भारतीय सैन्यात 31 वर्ष 6 महिने देशाच्या विविध ठिकाणी सेवाकर्तव्य पार पाडून सेवानिवृत्त झालेले अनिलरेड्डी सुरकुंटवार स्वगृही परत आले. त्या निमित्याने 2 ऑक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिग्रस ग्रामपंचायत व गावकऱ्यांमार्फत मोठ्या उत्साहात स्वागत करून संपूर्ण गावातूनवाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीदरम्यान गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

सुपुत्र अनिलरेड्डी सुरकुंटवार यांचा सत्कार सरपंच निलेश येल्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री याच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून त्यांच्या प्रतिमेला सेवानिवृत्त
सैनिक अनिलरेड्डी सुरकुंटवार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी य. जि. म. बँकेचे संचालक राजू येल्टीवार, पीएसआय टेंभरे, सरपंच नीलेश येल्टीवार, माजी सरपंच मारोती तमाने आदी उपस्थित होते..