
ढाणकी प्रतिनिधी : प्रवीण जोशी
के.डी.जाधव माध्यमिक विद्यालय कृष्णापुर व सत्य साई सेवा समिती, बाळूमामा सेवा समिती कृष्णापुर यांच्या संयुक्त विद्यमाने २तास कृष्णापुर ते (लहान तांडा) मोठानाला येथे श्रमदान करून रस्ता रहदारीसाठी सुरू करण्यात आला.. कृष्णापुर येथून या नाल्यावरून लहान तांडा , मोठा तांडा, विद्यार्थी, विद्यार्थिनी,गोविंदपुर, मेट, उमरखेड , ढाणकी , शेकडो शेतकरी या रस्त्याने येजा करत असतात. ह्या नाल्यावर पुलाची अत्यंत आवश्यकता आहे परंतु प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नाही.गावातील या नाल्यावर मोठा पूल बनवने अत्यंत महत्वाचे आहे.परंतु प्रशासनाने याकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे.त्यात के.डी.जाधव माध्यमिक विद्यालय कृष्णापुर व सत्य साईसेवा समिती, बाळूमामा सेवा समिती कृष्णापुर यांच्या संयुक्त विद्यमाने 2 तास श्रमदान दगड माती भरून मोठे खड्डे बुजवले व रस्ता पूर्वत सुरू करून दिला या कार्यक्रमासाठी शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक मंडळीचे दत्ता कदम लाईनमन लहान तांडा कृष्णापुर यांच्या घरी चहा, पाणी, बिस्कीट खाऊ वाटप करून माजी सरपंच के.डी हुलकाने, सत्य साई सेवा समिती व बाळूमामा सेवा समिती कृष्णापुर यांनी आभार मानून सांगता केली.
