

सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव शहरात विकास दृष्टीकरण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या 361 बी रोड ठरतोय अपघाती आज दि.16/1/2024रात्री 8 वाजताच्या दरम्यान वर्धा बायपास जवळ भिषण अपघात दोन ठार झाल्याची घटना घडली विरुध्द दिशेने शहरातील वाईन शॉप सुरू झाल्याने विरुध्द दिशेने ये जा करणाऱ्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने नेहमी त्याच ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.काल झालेल्या अपघातात आपल्या दिशेने येणारा रावेरी येथील संकेत वीनोद एकोनकर यांचा यवतमाळ येथील दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला तर आपटी येथील मनोज शंकर पुसणाके वय 28 वर्ष याना राळेगाव येथील दवाखान्यात मृत घोषित करण्यात आले.झालेला अपघात इतका गंभीर होता की, राळेगाव शहरातील बघ्याची भूमिका घेणारे मोठ्या प्रमाणात जमा झाले होते राळेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार जाधव साहेब घटना स्थरी पोहचून ऑटो बोलावून लगेच दवाखान्यात जखमींना उपचारासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास राळेगाव येथील पोलीस स्टेशन करीत आहे.
