
सहसंपादक: रामभाऊ भोयर
शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त शहरातील राजपुत संघटनेच्या वतीने ” वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती ” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील वर्धा बायपास चौक येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख मार्गावरून ‘भव्य रॅली काढण्यात आली त्यावेळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय अशा घोषणा देण्यात आल्या ही रॅली मुख्य रस्त्या वरून यवतमाळ रोडवरील वीर शिरोमणी महाराणा प्रताप उद्यान पर्यंत काढण्यात आली व या ठीकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी विशेषतः मिरवणुकीत युवती व महिलांचा मोठ्यप्रमाणावर सहभाग होता या रॅलीचें आयोजन राजपुत संघटना राळेगांव तर्फे करण्यात आले होते.
या वेळी ॲड प्रफुल्लसिंह चौहान, कमलेशसिंह गहलोत , सचिनसिंह चौहान, सुभाषसिंह गहरवाल, सुरेशसिंह गहरवाल, सह अन्य मान्यवर उपस्थित होते
