
वणीतील सुप्रसिध्द क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, विठ्ठलवाडी येथे सावित्रीबाई फुले वाचनालय आणि मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास वागदरकर तर प्रमुख पाहुणे वाचनालयाचे सभासद भाऊसाहेब आसुटकर आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी वाचनालयाचे संचालक अनिलकुमार टोंगे, मारोती जिवतोडे, सुरेन्द्र घागी, विनोद बोबडे, सभासद ॲड. अमोल टोंगे, म.रा.सं. सदस्य वसंता थेटे, नितीन मोवाडे, प्रभाकरराव मोहितकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव विजय बोबडे तर सुत्रसंचालन कोषाध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले. उपस्थितांचे आभार सहा. ग्रंथपाल शुभम कडू यांनी मानले. यावेळी वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
