अल्पभूधारक , भूमिहीन मजूरांना सरकारने योजनेचा लाभ दिला पाहीजे, कृषी मालाला योग्य भाव मिळाला पाहीजे तरच आत्महत्या प्रकरण थांबेल

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )

सध्या सगळीकळेचं वातावरण पहिले तर सगळं अंधाधुंद कारभार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. सगळीकडे कोणतेही काम दर्जेदारपणे आणि वेळेच्या आत होताना दिसत नाही. कुणाचं कुणावर नियंत्रण नसल्यासारखं प्रकार सगळीकडे पाहायला मिळत आहे. ज्याला ज्या पद्धतीने कमवता येईल त्या पद्धतीने कमविणे सुरु आहे.आज यवतमाळ जिल्ह्यात. शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रकरण दिवसेंदिवस ऐकाव्यास मिळत आहे. कारण. हे आत्महत्या प्रकरण कसे थांबेल यांच्यावर शासनाने विचार केला पाहिजे आज एका युवकाची आत्महत्या नंतर आणखीन एका शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची घटना असे अनेक वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळत आहे जर शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. अतिवृष्टी कोरडा दुष्काळ खते व कीटकनाशकसाठी येणारा अतिरिक्त खर्च, कोणत्याही शेतमालाला योग्य भाव न मिळणे आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च घरातील सर्वं खाण्यापिण्या साठी लागणार खर्च इत्यादी कारणामुळे या शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दिसून येत आहे.आज शेतकरी कुटुंबातील आपल्या मुलांना किंवा मुलीना कसेतरी वर्ग 1ते 12वी पर्यंत बळजबरीने आपल्या मेहनतीच्या बळावर रोजंदारी करून कसेतरी शिकवितो नंतर समोरील शिक्षण घेण्यासाठी त्याला झेपवत नसल्यामुळे त्या मुलांचा शैक्षणिक नुकसान होते.त्यामुळे गरीबाची मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शाळेत प्रवेश मिळाला पाहीजे , त्याना वसतिगृह मध्ये राहण्यासाठी मोफत प्रवेश दिला पाहीजे. अश्या गोष्टीकडे लक्ष शासनाने दिले पाहीजे तरच आत्महत्या प्रकरण थांबेल.