
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक ८ जानेवारी रोजी झालेल्या नवोदय परीक्षेत सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथील विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण होत शाळेचे नाव जिल्हास्तरीय गाजवले आहे आणि मानाचा तुरा रोवला आहे. विपुल प्रवीण सोनटक्के आणि कल्पक नरेंद्र साळवे यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
व जवाहर नवोदय विद्यालय यवतमाळ जिल्ह्यासाठी यांची निवड झाली आहे
या विद्यार्थ्यांनी आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष रणधीर सिंग दूहन, सचिव सत्यवान सिंग दुहन, प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई), शिक्षकवृंद आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सैनिक पब्लिक स्कूल वडकीचे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून, भविष्यातही अशीच प्रगती करतील, असा विश्वास शाळेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
