
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा स्तरीय 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या हॅन्डबॉल मैदानी स्पर्धा दर्डा विद्यालय क्रीडागण यवतमाळ येथे दिनांक 12 सप्टेंबर रोजी पार पडली यामध्ये राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 17 वर्ष वयोगटातील मुलांचा विद्यार्थीचा संघ झालेल्या अंतिम स्पर्धेत विजेता ठरला यामध्ये शाळेतील जिल्हास्तर विजयी संघात खेळाडूं म्हणून
अनुज कोवे,नैतिक कोवे, राहुल कोवे, भाविक भुडे, आर्यन येम्बडवार, देवाशू जुमनाके, ध्रुव किन्नाके, ध्रुप एंगडे विशाल कोवे, युग गेडाम हे विद्यार्थी खेडाळू म्हणून उपस्थित होते. तर जिल्हा स्तरावर विजयी संघ हॅन्डबॉल विभागीय स्पर्धा साठी बुलढाणा येथे उपस्थित राहणार आहे तसेच विजयी संघास
शाळेतील मार्गदर्शक शिक्षक सूचित बेहरे, विनोद चिरडे यांनी तसेच हॅन्डबॉल क्रीडा
मार्गदर्शक म्हणून सागर जुमनाके, यांनी मार्गदर्शन
यांनी केले असून
विजेता संघ बुलढाणा येथील विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेस पात्र ठरल्या मुळे विजेत्यां संघातील खेडाळूवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.विजेत्यां संघास जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ , न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, व शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
