राळेगाव येथे इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगाव, रविवार दिनांक १-१२-२४ रोजी प्रा.वसंतराव पुरके सरांच्या आभार सभेचा कार्यक्रमाचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार मा.प्रा.वसंतराव पुरके सर यांचा राळेगाव विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत पराभव झाला आहे .मला महाविकास आघाडीच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मला प्रचाराच्या संदर्भात मनाभावाने सहकार्य केले त्याबद्दल प्रा.वसंतराव पुरके सर यांनी दिनांक १-१२-२४ रविवारला दुपारी ११ वाजता राळेगाव येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात आभाराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी राळेगाव तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अवश्य उपस्थित राहावे. कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र तेलंगे (तालुका अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी), प्रदीप ठुने
(अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी) , विनोद काकडे
(तालुकाप्रमुख शिवसेना उबाठा ), इमरान पठाण (अध्यक्ष राळेगाव शहर शिवसेना उबाठा) , प्रकाश कुळसंगे(तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी केली. जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे असे आवाहन प्रा.वसंतराव पुरके सर यांनी केले आहे.