
माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी तांडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पिंपळवाडी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणीचे शिबिर घेण्यात आले होते
येथील जि.प.प्राथमिक शाळेत राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत नुकतीच शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली
निंगनूर प्राथमिक उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील दुबे, डॉ. सर्कगे, डॉ. सरोदे ,डॉ. बोरचाटे ,आरोग्य सेविका नेताम ,आरोग्य सेवक वाघमारे ,अशा सेविका आशाताई राठोड, अंगणवाडी सेविका देवकाबाई जाधव , यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तर विद्यार्थ्यांची तपासणी त्यांच्या पालकांच्या उपस्थित करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर , नरवाडे सर , उपस्थित होते.
डॉ. सरोदे सर यांनी विद्यार्थ्यांना आणी पालकांना वैयक्तीक आरोग्य व स्वच्छता संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी शिक्षकांनी सहकार्य केले.
