
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, बेरोजगार युवक आरोग्य शैक्षणिक, यांच्या हिताच्या गोष्टी करत शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने येथील खरेदी विक्री येथून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चाला प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख उपस्थित होते. त्याच बरोबर मोर्चाला माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके, अँडव्होकेट प्रफुल्ल मानकर आदिवासी सेवक किरण कुमारे उपस्थित होते. या कार्यक्रमात , शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, ओबीसी
विभागाचे अरविंद वाढोणकर, …..
, शिवसेनेचे तालुकाप्रमुख …., राष्ट्रवादी काँग्रेसचे बाभूळगाव तालुका अध्यक्ष प्रशांत वानखेडे तसेच विविध सहकार क्षेत्रातील मुरब्बी पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार उपस्थित होते. अशा ऐनवेळी वातावरण बिघडून सुद्धा पाच हजारांच्या जवळपास संख्या उपस्थित होते.यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांला निवेदन दिले आणि ताबडतोब शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सांगितले.या मोर्चातील आजची उपस्थिती सत्ताधाऱ्यांची झोप उडविणारी होती या मोर्चाची पूर्ण तालुक्यातील जनतेत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
