
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार १आग्स्ट ते ७ आगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने मा.सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव व मा. अमित भोईटे तहसीलदार राळेगाव व नरेंद्र हलामी निवासी नायब तहसीलदार यांचे मार्गदर्शनात राळेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल वरध मंडळातील खैरगाव कासार येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.वरध मंडळातील एकुन १७ गावा पैकी१६ गावे पेसाअंतर्गत येत असून सदर गावात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहत असून त्यांना २५ते ३०किलोमिटर तालुक्याचे ठिकाणी न जाता मंडळातील गावात सर्व विभागाच्या योजनांची कामे व्हावीत या उदात्त हेतूने महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले.सदर अभियाना मध्ये वरध मंडळातील सर्व 17गावातील अंदाजे 425ते 450लोकांनी उस्फूर्त सहभाग नोदविला. त्यामध्ये महसूल विभाग, पंचायत विभाग ,कृषी विभाग, आरोग्य विभाग ,अंगणवाडी सेविका ,पो.पाटील,स्वस्त धान्य दुकानदार,आधार केंद्रचालक,csc सेतु चालक यांनी उपस्थित राहून सेवा पुरविल्या.सुरवातीला सरपंच श्री माणिक किनाके व उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. शासनाचे महसूल विभागात राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत तसेच कृषी,पंचायत या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजने बाबत माहिती देण्यात आली. महसूलशिबिरामध्ये महसूल विभागा मार्फत 41उत्पन्न दाखले,22जातीचे दाखले,4अधिवास प्रमाण प
त्र,29 फॉर्मर आयडी,30आधार अपडेट ,सातबारा, आठ
अ,फेरफार व इतर दाखले88 देण्याचं आले,कृषी विभागा मार्फत15, पंचायत विभागा मार्फत35,आरोग्य विभागामार्फत 99लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 361दाखल्याचे वाटप करण्यात आले.शिबिर यशस्वी करण्याकरिता वरध मंडळाचे मंडळ अधिकारी अनिल कणसे,ग्राम महसूल अधिकारी राजेद्र तुमराम, धर्यशिल बोंदांडे, गजानन जयस्वाल,राहुल उईके,नितीन जुमनाके,काजल किनांके व वरध मंडळ तील सर्व महसूल सेवक, ग्रामरोजगार यांनी परिश्रम घेतले.
