
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील बरडगाव येथील मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज चा १०० %निकाल लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेऊन विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे. यामध्ये मेघना गिरी 86%,साक्षी दारुणकर 80%,हर्ष खाडे 79%,शिवराज कोकुलवार 75%, श्रेयश वानखेडे 74%, अवंतिका बनसोड 73.50%, मयंक बोरा 72% व दिया मशरू 71% या विध्यार्थ्यांनी टॉपर येवून यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत असून. संस्थेच्या अध्यक्षा तथा प्राचार्या डॉ. शीतल बल्लेवार तसेच संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यानी यशाचे श्रेय कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक राहुल हिवरकर,नितीन पाल, अतुल धारपुरे,राजश्री पानसे,यज्ञेश इरपाते आदी शिक्षकांना व पालकांना दिले.
