
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी
१८ मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे अनेक फळ व फळावह पिकाचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्याला थोड्याफार स्वरूपात आर्थिक मदत मिळाल्यास योग्य होईल विशेष म्हणजे पेन्शन संदर्भात राज्यातील सर्वच कर्मचारी बांधवांचा संप होता एवढे सगळे गंडांतर असताना निसर्गाने सुद्धा त्यात भर टाकून शेतकरी बांधवाला अधिकच अडचणीत आणले टरबूज पिकाचे अतोनात हाल झाले काही दिवसानंतर टरबुजाची फळबाग विकल्यानंतर शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होत होती पण प्रचंड सोसाट्याचा वारा आणि पडत असलेल्या गारांमुळे होत्याचं नव्हतं झालं रानाचा पसारा नेमकी कुठे कुठे शेतकरी राजा आपला माल झाकणार गारपीट झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उमरखेड महागाव विधानसभेचे आ नामदेव ससाणे यांनी गांजेगाव शेत शिवारात जाऊन शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि शासकीय यंत्रणेला पंचनामे करण्याचा आदेश दिला व लगेच शासकीय यंत्रणे सुद्धा तितक्याच कार्यतत्पर पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या आदेशाला आपल्या कार्यतत्पर कार्यातून कार्यप्रणाली राबवून गांजेगाव आणि शिंदगी शेत शिवारातील पिकांचे स्थळ निरीक्षण करण्याचे काम आघाडीवर राबवून आपली जलद कार्यपद्धती दाखवली यावेळी कृषी विभाग तलाठी यांनी नुकसानग्रस्त भागाचे स्थळ निरीक्षणाचे काम केले तर काही ठिकाणचे स्थळ निरीक्षणाचे उर्वरित काम तत्काळ व जलद पद्धतीने करून शक्य तितक्या लवकर स्थळ निरीक्षण अहवाल शासन दरबारी सादर करू असे यावेळी सांगण्यात आले यावेळी कृषी सहाय्यक लोंढे, तलाठी आर.जी. गारोळे, कोतवाल आनंद पैठणकर, यांनी यावेळी नुकसानग्रस्त भागाचे स्थळ निरीक्षणाचे काम जलद पद्धतीने राबविले
