
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
कीन्ही जवादे ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा साठी जल जिवन मिशन योजनेतून पाण्याची उंच टाकी , उर्ध्व नलीका,व पाणी वितरण व्यवस्था च्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक नामदेवराव मोहर्ले, विजुभाऊ वाढई ,मद्दीसेठ घेई,यांचे शुभहस्ते झाले.कीन्ही जवादे येथे याआधी तत्कालीन सरपंच( २०१०/१५) सुधीर जवादे यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाण्याची उंच टाकी, उर्ध्व नलीका, वितरण व्यवस्था, विहीर खोलीकरण करून गावातील पाणी प्रश्न सोडविला होता.त्यानंतर वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाच्या जल जिवन मिशन योजनेतून ग्रामपंचायत कीन्ही जवादे यांनी नविन पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली.
भुमीपुजन कार्यक्रमास सरपंच सुधीर जवादे,सचीव सुनील येंगडे साहेब, उपसरपंच रमेश तलांडे, सदस्य प्रसाद निकुरे, प्रतिभाताई मोहुर्ले, सुषमाताई जवादे, सिमाताई ऊईके, मालाताई लोणबले, पोलिस पाटील अनुराग जवादे, कीशोरभाउ गमे नरेश ठाकरे, उमेश पेंदोर, रमेश भेंडारे, गौरव चवरडोल,प्रणय वाढई, जनार्दन ढेकणे सुभाषबाबू झाडे,कर्मचारी पुंडलिकराव लोणबले मारुती ईठाळे धनराज तोडसाम,व नागरिक उपस्थित होते.
