
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आज पर्यावरण दिनानिमित्त नगरपंचायत मारेगाव द्वारे मा. लोकप्रतिनिधिंच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहिमेस सुरवात करण्यात आली. नगरपंचायत आवारात वृक्षारोपण करून मोहिमेची सुरवात करण्यात आली. नगरपंचायतीने शहरात विविध ठिकाणी तब्बल 25 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. याप्रसंगी नगरपंचायतच्या उपाध्यक्षा हर्षा महाकुलकर, नगरसेविका छाया किनाके, नगरसेवक नंदेश्वर असुटकर, नगरसेवक हेमंत नरांजे, मुख्याधिकारी शशिकांत बाबर (मशप्रसे) व नगरपंचायतीचे सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. शहरास हरित करणे व पर्यावरणाचे संवर्धन करणे याकरिता नगरपंचायत लोकसहभागातून प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याकरिता सहकार्य करावे, तसेच लावलेल्या वृक्षाची आपल्या अपत्याप्रमाणे देखभाल देखील करावी असे आवाहन यानिमित्ताने मुख्याधिकारी यांनी समस्त शहरवासियांना केले.
