
सहसंपादक : रामभाऊ भोयर
उच्चदाब अथवा अन्य तांत्रिक कारणाने विद्युत रोहित्रावरील फ्यूज उडाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी वेळीच पोहोचत नसल्याने ओलतीची कामे वेळेवर होत नसल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांनाच वायरमनची कामे करावी लागत आहे.तालुक्यात ग्रामीण भागातली ही परिस्थिती दिसून येत आहे.
वारंवार होणाऱ्या विद्युत रोहित्रावरील शेतातील विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणचे कर्मचारी वेळेवर उपस्थित होत नसल्याने दोन दिवसात होणाऱ्या ओलतीच्या कामांना आठ आठ दिवस तेच काम करावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त होऊन स्वतः अशावेळी शेतकऱ्यांकडून ॲल्युमिनियमच्या ताराने फ्युज बायपास केले जातात हे धाडस जीव घेणे ठरू शकते त्यामुळे वीज यंत्रणेत कोणतेही कारणाने बिघाड झाल्यास याची माहिती महावितरण कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे परंतु असे न करता शेतातील ओलतीची कामे लवकर व्हावी या आशेने ग्रामीण भागातील शेतकरी लाईनमन बनू लागला आहे.
