
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्याचे मंत्री बबनराव लोणीकरांनी केलेल्या भाषणात बोलताना शेतकरी, कर्मचारी, महिला भगिनींना मिळत असलेला निधी हा मोदी साहेबांकडून दिला जात असून ते तुमचे आमचे सर्वांचे बाप असल्याचे वक्तव्य करून महाराष्ट्रातील शेतकरी, कर्मचारी, महिला भगिनींना अपमानास्पद वागणूक दिल्याकारणांने आज दिनांक 1/7/2025 ला कृषी दिनी म्हणजे स्व वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आणि शेतकरी, महिला भगिनीच्या वतीने संबंधित मंत्री बबनराव लोणीकर यांचा निषेध नोंदवून शासनाला निवेदन पाठवून त्यांच्यावर कारवाई करून त्यांनी आपण केलेले वक्तव्य खरोखरच चुकीचे आहे असे मान्य करून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.त्यावेळी निवेदन उपविभागीय अधिकारी पाटील साहेब यांना दिले त्यावेळी तहसीलदार अमित भोईटे उपस्थित होते.निवेदन दिल्यानंतर माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सरांनी नारे देऊन संबंधित मंत्र्यांचा निषेध नोंदविला. याही अगोदर दोन मत्र्यांनी संतापजनक उदगार काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते,त्यावेळी प्राध्यापक वसंतराव पुरके सरांनी हे सरकार खरोखरच शेतकरी, कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगार महिला भगिनीच्या हक्काचे सरकार नसून हे सरकार सामान्य जनतेच्या विरोधातील सरकार असल्याचे सांगितले. त्यावेळी निवेदन देताना माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर, कांग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर अरविंद वाढोणकर , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपाध्यक्ष भरत पाल, तसेच अंकुश रोहणकार, अंकुश मुनेश्वर सुधीर जवादे वैकुंठ मांडेकर मंगेश पिंपरे शुभम चिडाम प्रफुल्ल तायवाडे गोविंद चहांदकर केशवराव पडोळे राजु पुडके स्वप्निल जयपूरकर मनोज पेंदोर अफसर अली श्रावणसिंग वडते, अशोक काचोळे, अफसर अली, वनिष भोसले, कुंदन कांबळे, राहुल होले, अशोक पिंपरे, मधूकर राजूरकर, दिलीप दुधगिकर,धवल घुंगरूड, बाळासाहेब दरणे, सदानंद भोरे, जनार्दन कडू किरण निमट,पुनेश्वर ऊईके, आशिष कोल्हे, अभिजित मानकर, महादेव मेश्राम, मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ वर्षाताई तेलंगे, चदाताई पिंपरे,अल्काताई कुडमते वेणूताई मेश्राम,मालाताई खसाळे पुष्पा किन्नाके, यामिनी चाफले ज्योत्स्ना डंभारे, अश्विनी नागोसे, राजेंद्र महाजन, गजानन झाडे अभिलाष उमरे नितीन खडसे, रंजित कोरडे, राजू पुडके मधूकर चाफले ,रामा कुळसंगे,नंदु जयसिंगकार, प्रविण येंबडवार, मनिष मुरार, इंगोले,हमिदभाई पठाण, कुणाल इंगोले निलेश हिवरकर, विजय शेंडे,राजू मोहुर्ले, प्रकाश पोपट, सचिन टोंग,शंकर दातारकर, बाबाराव येरेकार, जितेंद्र कहूरके, विनोद माहुरे,अंकित कटारिया, अशोक भागवत,प्रशांत ठाकरे प्रभाकर जुनगरे यांच्या सह अनेक राजकीय पदाधिकारी व शेतकरी बंधू भगिंनी उपस्थित होते.
