राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे 19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन रिधोरा ग्रामवासी यांच्याकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रवीण कोकाटे माजी प.स. सभापती तर प्रमुख अतिथी उमेश गौउळकार सरपंच, हरीश काळे संचालक ग्रा. वि., दीपक पवार संचालक ग्रा.वि. , टिनूताई ठेंगणे उपसरपंच, नामदेवराव वाढंई संस्थापक गावरान विकास संस्था रिधोरा, ढगेश्वर मांदडे पोलीस पाटील, अनंतराव वाढंई अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, भानुदास आडे तंटामुक्ती अध्यक्ष, निखिल कडू अध्यक्ष साया संस्था रिधोरा, विष्णू महाजन अध्यक्ष ग्रा.वि., राजू गुरनुले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, शरद सातघरे उपाध्यक्ष ग्रा.वि, ग्रामपंचायत सदस्य अरविंद गाउत्रे , वृषाली पवार, वैशाली गुरनुले, मनीषा गुरनुले, सुलोचना आडे, टी. झेड. माथनकर मुख्याध्यापक सर्वोदय विद्यालय रिधोरा, सुखदेवे मुख्याध्यापक जि प शाळा रिधोरा, पंढरी खडसे सचिव ग्रा.प. रिधोरा, आधी सर्व मान्यवरांच्या उपस्थिती विविध कार्यक्रम होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर अ गटातील खुली वकृत्व स्पर्धा ठेवण्यात आली आहे या खुल्या वकृत्व स्पर्धेत प्रथम पुरस्कार ७००१ प्रवीण कोकाटे माजी सभापती प.स. राळेगाव यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार ५००१ उमेश गौऊळकार सरपंच , यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार ४००१ विलास पवार यांच्याकडून, तर चतुर्थ पुरस्कार ३००१ कवडू राऊत यांच्याकडून तर ब गटातील १६ वर्षा आतील वकृत्व स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कार ७००१ हरीश काळे संचालक ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था रिधोरा यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार ५००१ दीपक पवार संचालक ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था रिधोरा यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार ४००१ अनिल पदमावार यांच्याकडून तर चतुर्थ पुरस्कार ३००१ कुणाल पवार यांच्याकडून देण्यात येणार आहे तर गड किल्ले प्रदर्शनी स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे या दोन्ही स्पर्धेमध्ये भव्य अशी बक्षिसाची लूट होणार आहे यात गडकिल्ल्यांची प्रतिकृती तयार करणाऱ्या प्रथम स्पर्धकांना २००१ चंद्रशेखर लेनगुरे यांच्याकडून तर दुतीय पुरस्कार १५०१ ढगेश्वर मांदाडे पोलीस पाटील यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार १००१ राजू गुरनुले यांच्याकडून तर चतुर्थ पुरस्कार ७०१ धनराज येरणे यांच्याकडून देण्यात येणार आहे तर रांगोळी स्पर्धा यामध्ये गावकऱ्यांसाठी आपल्या घरासमोर सुंदर अशा रांगोळी रचना करनाऱ्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार १००१ मयूर पंडिले यांच्याकडून, द्वितीय पुरस्कार ९०१ सुभाष वाटगुळे यांच्याकडून तर तृतीय पुरस्कार ८०१ पांडुरंग सोनुले यांच्याकडून चतुर्थ पुरस्कार ७०१ शुभम येरणे यांच्याकडून तर पाचव्या क्रमांकाचे पुरस्कार ६०१ भास्कर तोडासे यांच्याकडून तर सहाव्या क्रमांकाचे पुरस्कार ५०१ कवडु ढोले यांच्याकडून तर सातव्या क्रमांकाचे पुरस्कार ४०१ संजय बोबडे यांच्याकडून तर आठव्या क्रमांकाचे पुरस्कार ३०१ गणेश ठेंगणे यांच्याकडून देण्यात येणार आहे. सदर वकृत्व स्पर्धा व गडकिल्ले प्रदर्शनी स्पर्धेला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे त्यानंतर शिवजन्मोत्सव भव्य अशी शोभायात्रेला हनुमान मंदिरापासून सुरुवात होईल नंतर छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांचे स्वागत व मनोगत होईल व मान्यवरांच्या हस्ते वरील स्पर्धकांचे बक्षीस वितरण केले जाईल