प्रधानमंत्री पिक योजना खरीप 2023
खरीप हंगामातील सर्व पिकांचा पिक विमा फक्त एक रुपये मध्ये

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड


यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की खरीप हंगाम 2023करीता प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्य, व केंद्र सरकारने ही योजना राबविण्यात येत आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी आपण आपले आधार कार्ड,7/12उतारा 8अ, भाडेपट्टा करार असलेल्या ( करारनामा /सहमती पत्र (असल्यास )पेरणी (पिकपेरा )स्वयंघोषणापत्र, बँक पासबुकची प्रत, हे घेऊन CSC केंद्रावर जाऊन आपण आपले पिक विमा भरून घ्यावे ज्वारी प्रति एक रुपया मध्ये एक हेक्टर, सोयाबीन एक रुपया मध्ये एक हेक्टर, उडीद /मुग एक रुपया मध्ये एक हेक्टर,तुर एक रुपया मध्ये एक हेक्टर,कापूस एक रुपया मध्ये एक हेक्टर असे प्रत्येकी पिकाचे पीकविमा प्रति एक रुपया मध्ये भरून मिळणार आहे तरी यांची अंतिम दिनांक 31/जुलै पर्यंत आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपण आपले कागद पत्र घेऊन CSC केंद्रावर जाऊन भरून घ्यावे