पोलिस अधिकारी सृष्टी जैन यांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई

..
प्रमोद जुमडे/हिंगणघाट

पोलिस विभागाच्या धडक कारवाहित अवैध रेती वाहतूक करणारे पाच टीप्पर जप्त
पोलिस उपअधीक्षक तथा परिविक्षाधीन अधिकारी सृष्टी जैन यांनी आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थानिक कवडघाट येथे धडक कारवाही करत अवैध रेती वाहतूक करणारे पाच रेती चे टीप्पर जप्त करत.ते स्थानिक पोलीस स्टेशन ला लावले.
गेल्या काही दिवसापासून हिंगणघाट तेथील अवैध रेती व्यवसायाची खूप चर्चा सुरू होती तश्या बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या त्यावरून राजकीय चिखलफेक सुद्धा झाली. प्रशासन कुठलीही कारवाही करत नाही या बद्दल जनतेमध्ये रोष होता. पण आज पोलीस अधिकारी सृष्टी जैन यांनी केलेल्या कारवाही चे जनतेने स्वागत केले.
महत्वाची गोष्ट म्हणजे गौण खनिज उत्खनन व अवैध वाहतूक या वर लक्ष देण्याचं काम महसूल विभागाचं पण स्थानिक तहसीलदार उपविभागीय अधिकारी हे अश्या अवैध व्यवसायावर कुठलीच कारवाही करताना दिसत नाही.हिंगणघाट महसूल विभागाला रेती वाहतूक करणारे छोटे ट्रॅक्टर दिसतात पण अवैध वाहतूक करणारे मोठमोठे टीप्पर दिसत नाही स्थानिक उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना जणू काही माहीतच नाही की काय असं वाटते.
पण पोलीस अधिकारी सृष्टी जैन यांनी केलेली कारवाही म्हणजे महसूल विभागाला खूप मोठी चपराक आहे . गेल्या वर्षी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नूर उल् हसन यांनी धडक कारवाही करत मुद्देमाल जप्त केला पण स्थानिक
महसूल विभाग कारवाही करण्याच जाणीवपूर्वक टाळत होते. हे विशेष