कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रतापजी भोस यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप व बक्षीस वितरण

ढाणकी – प्रतिनिधी(प्रवीण जोशी)

स्थानिक जि.प.के.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ठाणेदार प्रतापजी भोस यांच्या शुभ हस्ते गणवेश वाटप व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम 2 सप्टेंबर 2022 रोजी दु.12 वाजता शाळेच्या प्रांगणात सपन्न झाला.
दरवर्शी केंद्र व राज्य सरकार कडून शालेय गणवेशासाठी समग्र निधी शासकीय शाळांना प्राप्त होतो.त्या अनुषगाने ढाणकीतील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीच्या 280 मुला – मुलींना प्रत्येकी 2 या प्रमाणे 560 गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रतापजी भोस होते.तर प्रमुख उपस्थितीत माजी पं.स.समितीचे सभापती ख्वाजाभाई कुरेशी ,ढाणकी न.प.चे नगरसेवक, समाजसेवक म्हणून परिचित असलेले संबोधी गायकवाड,नगरसेवक बाळाभाऊ योगेवार , व सामाजीक कार्यकर्ता वंचीतचे जिल्हा महासचीव जाॅन्टी उर्फ प्रशांत विणकरे,सामाजीक कार्यकर्ता पंकज केशेेवाड ,साईनाथ मंतेवाड,पत्रकार संघाचे विनोद गायकवाड,स्वप्नील चिकाटे सचिव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गायकवाड,शाळेच्या मुख्याध्यापीका वनमाला जवळेकर व इतर पदाधिकारी मान्यवर हजर होते.
उपक्रमशील म्हणून या शाळेची या परीसरात ओळख आहे. दरवर्षी या शाळेकडून जनहितार्थ व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उपक्रम राबविले जातात.या वर्षी सुध्दा देशाच्या 75 व्या अमृत मोहत्सवानिमित्त शाळेत हस्ताक्षर,चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदविला.हस्ताक्षर स्पर्धेत शुभांगी दशरथ तिरमकदार हिने प्रथम क्रमांक मिळविला तर व्दितीय परितोषिकाची मानकरी अंजली उत्तम पाईकराव हि चिमुकली ठरली.चित्रकला स्पर्धेत मेघा सारनाथ राउत हिने पहिले बक्षीस पटकावीले तर संचिता अमोल कांनिंदे हि चिमुकली दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.रांगोळी स्पर्धेत वर्ग पाचवीची अंकीता अमोल कानिंदे हिने पहिले बक्षीसाचा मान मिळविला.तर दुसरे बक्षीस साक्षी सारनाथ राउत हिने आपल्या नावे केले.
विविध स्पर्धेत विद्यार्थी विद्यार्थ्यांना आपल्या बुध्दी कौशल्याची चुनूक दाखविली.त्यांच्या हुशारीची व कौतुक कलेचे ठाणेदार प्रतापजी भोस यांनी तोंड भरून कौतुक करीत शांब्बासकीची थाप दिली.ख्वाजाभाई कुरेशी यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांना करतांना म्हणाले की,सद्यस्थीतीत पालकांचा इंग्रजी शाळेकडे असणारा कल हा भविष्यात मराठी शाळेची डोकेदुखी ठरू शकते त्यासाठी मराठी शाळेच्या शिक्षकांना कठोर परीश्रम घेवून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणाना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतीक व शैक्षणीक उपक्रम राबवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे गरज असल्याचे सांगीतले.
यावेळी प्रशांत विणकरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचा स्तुत्य उपक्रमांचे कौतूक केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याध्यापिका वनमाला जावळेकर ,सुत्रसंचालन गजानन कुंभरवार तर आभार शरद बचाटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.राठोड,श्री.शेळके,श्री.प्रतापवार,श्री.केंद्रे,श्रीमती इरलेवार,श्रीमती शिणकरे,श्रीमती पालेकवाड इत्यादी शिक्षक वृंदानी अथक परीश्रम घेतले.