
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील टाकळी येथील किशोर झोटिंग हे आपल्या कुटुंबा सोबत मोटरसायकलने टाकळी वरून वडकी येथे जात असताना वाढोणा बाजार गावाजवळ त्यांच्या मोटर सायकलला जनावरे आडवे आल्याने किशोर झोटिंग व त्यांच्या पत्नी तसेच दोन वर्षाचा मुलगा हे सगळे खाली पडले असता त्यांच्या दोन वर्षांच्या मुलला हाताला व पायाला जबर मार लागला तसेच किशोर झोटिंग यांच्या सुद्धा हाताला तसेच पायाला मार लागून रक्त स्त्राव सुरू होता त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणा बाजार येथे दाखल केले परंतु तेथील डाॅक्टर हे संपात सहभागी असल्याने उपचार होऊ शकला नाही विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रात ईतर कर्मचारी हजर होते. तात्पुरता उपचार चालू होता मात्र औषधी विभागाला कुलूप लावले होते त्या विभागाची चाबी नेमकी कोणत्या कर्मचारी यांच्या जवळ होती ते एकाही कर्मचारी यांना माहिती नव्हती सदर कर्मचारी हा औषधी विभागाची चाबी खिशात घेऊन बाहेर फिरायला गेला होता अशी माहिती प्राप्त झाली. नेहमी वादाच्या भोवऱ्यात हे प्राथमिक आरोग्य केंद्र दिसून येते. वरिष्टांनी या गोष्टीची दखल घेऊन या आरोग्य केद्रांची सुविधा व्यवस्थीत करावी अशी मागणी वाढोणा बाजार येथील नागरिकांची आहे.
आमच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच अधिकारी तसेच कर्मचारी हे अपडाऊन मध्ये आपला वेळ वाया घालवत असताना दिसत आहे विशेष म्हणजे पेशंटला वेळेवर उपचार मिळत नाही साफसफाई नाही तसेच पिन्याचे पाणी सुद्धा मिळत नाही या सर्व सोईसुविधा मिळाल्या नाही तर आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकनार
शेर अली लालाणी
समाजसेवक वाढोणा बाजार
