सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल येथील तेरा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आष्टा मेंगापूर आपल्या गावी ऑटोने परत जात असताना मार्गात ऑटो पलटी होऊन तेरा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली पैकी युग भोरे मंगल अंडरस्कर काजल करलुके पवन पांडे या चार विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत असल्यामुळे यवतमाळ येथे उपचारासाठी ठेवण्यात आले आहे जखमी विद्यार्थी लखन खांडरे श्रवण भोरे तुषार हरपलवार अनुज फुलमाळी विक्रम पारिसे छकुली शिवरकर यांना किरकोळ जखमी असल्याने ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे उपचार घेतल्यानंतर सुट्टी देण्यात आली… राजू जळेकर असे ऑटो चालकाचे नाव असून त्याच्या मालकीचा हा ऑटो आहे तो नेहमीच आष्टा मेगापूर बोरी येथून विद्यार्थी शाळेत आणतो व गावी परत नेतो घटना घडल्यानंतर शाळेतील शिक्षक वर्ग व पालक नी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे गर्दी केली. चार वर्षा आधी आष्टा येथील विद्यार्थी ऑटो मध्ये शाळेत येत असताना अपघात होऊन ठार झाला होता त्याच घटनाची पुनरावृत्ती आज झाली दरम्यान चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते इतर विद्यार्थ्यांची नावे मिळू शकली नाही यासंदर्भात राळेगाव पोलीस स्टेशनला कुठलेही तक्रार नसल्याची माहिती आहे.
