विकास कारमोरे हे आचार्य पदवीने सन्मानित

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव येथील न्यायाधीश विकास गोसावी कारमोरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांची कडून आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले त्यांच्या संशोधनाचा विषय बाल गुन्हेगारी असून त्यांना डॉ मनोज बेंडले यांचेकडून मार्गदर्शन लाभले विकास कारमोरे हे सध्या जिल्हा सत्र न्यायालय जालना येथे न्यायाधीश पदावर कार्यरत आहे ते आपल्या यशाचे श्रेय आई वडील मित्रपरिवार गुरुजन यांना देतात राळेगाव सारख्या ग्रामीण क्षेत्रात त्यांनी केलेल्या नेत्र दीपक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.