

सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कोच्ची ग्रामीण भागात गेल्या दीड वर्षापासून गावाला होणारा पाणीपुरवठा अतिशय दूषित असून संपूर्ण गाव हे दूषित पाणी पीत आहे ज्या पाण्याने कपडे आणि भांडी सुद्धा धुण्याची इच्छा होत नाही ते पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्या अधिकाऱ्याने मला त्याबाबत सॅम्पल आणून दाखवा नंतर बघू असे उत्तर दिले पाण्याचे सॅम्पल दिल्यानंतर देखील त्यावर कोणतीही कारवाई केली नाही उलट पुढे बघू असे उत्तर देऊन हात वर केले राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे डॉ. प्रा. अशोकराव उईके यांनी जनता दरबार घेतला असता त्यांना गावकऱ्यांनी बाटल्या मध्ये पाणी आणून दाखविले शंकर जवादे आणि सचिन गोफणे यांनी एका बाटलीत पाणी आणून ते आमदारासमोर पिले आणि आमदाराला देखील पाणी पिण्यासाठी सांगितले मात्र आमदारांनी ते पाणी पिण्यासाठी सरळ नकार दिला त्यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आम्ही गेल्या दीड वर्षापासून हे पाणी पीत आहे आमच्या गावातले लोक रोगग्रस्त झाले आहे अनेकांनी वेगवेगळ्या आजाराला या पाण्यातून निमंत्रण दिले आहेत तर काहींचा जीव देखील यात गेला आहे आमची लोक आजारी पडू शकतात तुम्ही पण हे पाणी पिऊन पहा तुम्हाला काय त्रास होत आहेत मात्र यावेळी चक्क आमदारांनी नकार दिला आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगतो असे सांगितले मात्र तरीही गावकऱ्यांचा संताप काही कमी झाला नव्हता त्यांची आग्रही भूमिका एवढीच तुम्ही एकदा हे पाणी पिऊन पहा मग तुम्हाला कळेल गावकरी कसे जगतायेत ते! गावकरी संतप्त झाल्यानंतर आमदार अशोक उईके यांनी गावकऱ्यांसमोर नमते घेऊन उद्याचे प्रकरण निकाली काढण्यासंदर्भात मी सांगणार आहे असे करून जमावाला शांत केले.
कंत्राटदार बिल घेवून गायब ?
गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन संबंधित ठेकेदाराने टाकली आता ठेकेदार सर्व बिले काढून मोकळा झाला वास्तविक पाहता त्या ठेकेदारालाच या विभागाच्या अधिकाऱ्याने ज्या ठिकाणी लिकेज असेल ते लिकेज काढण्यासाठी सांगण्याची गरज असते तसेच नेमकं पाणी कुठे दूषित होत आहे हे पाहण्याची जबाबदारी देखील प्रशासनाची असून तीही प्रशासनाने ठेकेदाराकडून आणि आपल्या अभियंताकडून समजून घेणे गरजेचे आहे मात्र हे देखील पाहण्यासाठी तयार नाहीत.
भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आमदार साहेबांना घरचा अहेर का ?
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही दूषित पाणी पिऊ शकतो तर तुम्ही का पिऊ शकत नाही तुम्ही हे पाणी पिऊन द्या अशी इच्छा दर्शवली पाणीपुरवठा अधिकारी व इंजिनियर कोणाच्या बापाचा ऐकत नसण्याची आमदारासमोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली. हे इंजिनियर व अधिकारी पैशाचं काम अगोदर करतात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर लोक जोड्या मारण्याची कंडिशन येऊन असल्याची एवढी खराब कंडिशन येऊन असल्याची एका पाणीपुरवठ्या अधिकाऱ्या व इंजिनियरमुळे अजून पर्यंत यावरती कोणतीही कारवाई न केल्याची जनता बोलला जात आहे
