
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
ऐन पावसाळा काही दिवसावर येवून ठेपला असून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पूर्व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीच्या कामाला सुरुवात केली असून ऐन मशागतीच्या कामाकरिता स्वमालकीचे ट्रॅक्टर असून आम्हाला डिझेल मिळत नसल्याने आमची मशागतीची कामे खोळंबली असून आम्हाला शेती मशागतीच्या कामाकरिता नियमित किमान दररोज ४० ते ५० लीटरचा डिझल चा पुरवठा करण्यात यावा याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यां जवळ स्व मालकीचे ट्रॅक्टर आहे परंतु शेती मशागतीची कामे करण्याकरिता डिझेल मिळत नसल्याने शेती मशागती कामे थांबली असून डीझेल ची अत्यंत आवश्यकता आहे . परंतु कोणताही पेट्रोल पंपावरती डिझेल पुरवठा होत नाही .आमचा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असून आम्हाला आमच्या ट्रॅक्टर करिता { शेताची मशागती करिता डीजल पुरवठा योग्य न झाल्यास आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते तहसीलदार साहेब यांनी आम्हाला प्रती दिन ४० ते ५० लीटर डिझालचा पुरवठा करण्याकरिता पेट्रोल पंप चालकांना आदेश देण्यात यावे या आशयाचे निवेदन आज दिनांक ११ मे २०२५ रोजी देण्यात आले निवेदन देतेवेळी मनोज कवडू कुबडे, प्रणय लीलाधर झाडे गजानन लक्ष्मण धूडसे, धीरज अजय शिवणकर, निलेश रमेश फाळे अभिजीत नागोराव गजबे, वेदांत प्रकाश क्षीरसागर, संदीप अण्णा घोटेकर,निलेश सतीश कोरडे, शशिकांत केवटे, शुभम गायधने, योगेश ब्राह्मणवाडे, गणेश कानारकार, दिनेश पवार, आकाश देशमुख पवन वारेकर राहुल मानकर,अभिषेक तिजारे,आदी शेतकरी उपस्थित होते
