गोंडवाना गणतंत्र पार्टी आदिवासी च्या न्याय हक्कासाठी मोठा संघर्ष करतं आहे-प्रदेश कार्याध्यक्ष बळवंतराव मडावी


राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ जिल्हा शाखा गठीत करुन जिल्हा कार्यकारिणी मध्ये नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील सामाजिक, राजकीय कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या जिल्हा कार्यकारिणी च्या आयोजनात प्रमुख उपस्थिती मा.बळवंतराव मडावी प्रदेश कार्याध्यक्ष मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.वसंतराव निकम जेष्ठ नागरिक गोंडवाना गणतंत्र पार्टी मा विजया रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) मा विशाल वाघ जिल्हा अध्यक्ष ( ओबीसी सेल ) आणि मा विठ्ठल दादा धुर्वे जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यांच्या उपस्थितीत नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे — जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी मा विठ्ठल धुर्वे जिल्हा अध्यक्ष यांनी नांव सुचित केले मा.ज्ञानेश्र्वर कुमरे जिल्हा कार्याध्यक्ष मा राजेंद्र येडमे जिल्हा उपाध्यक्ष मा हर्षल आडे जिल्हा संघटक मा राजेंद्र मडावी जिल्हा सहसचिव मा.मारोती मडावी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा हणुमान टेकाम ता अध्यक्ष कळंब सौ वर्षा आडे तालुका अध्यक्ष राळेगाव सौ कलावती ऊईके तालुका संघटक कळंब यांची नियुक्ती केली असता विशाल वाघ यांनी अनुमोदन दिले. — जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली नवं नियुक्त पदाधिकारी यांना सामाजिक बांधिलकी, राजकीय डावपेच, सत्ताधारी आपण कसे आहोत या साठी मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य यांनी योग्य मार्गदर्शन केले आणि अध्यक्षिय भाषणं मा बळवंतराव मडावी करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.