९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त
भव्य संविधान हक्क परिषद व सांस्कृतिक कार्यक्रम

कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – डॉ.अरविंद कुळमेथे

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त कळंब येथील बस स्टँड जवळ माँ.भवानी मंगल कार्यालय येथे बिरसा ब्रिगेडच्या वतीने बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ. अरविंद चंद्रभान कुळमेथे यांच्या नेतृत्वात भव्य संविधान हक्क परिषद व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत केलेले आहे. या कार्यक्रमा मध्ये आदिवासींचे संविधानिक हक्क अधिकार यावर समस्त जनतेला प्रबोधन करण्यात येईल व आदिवासींच्या सांस्कृतिक परंपरा जपणारे आदिवासी सांस्कृतिक नृत्य याचे प्रदर्शन केल्या जाईल. कार्यक्रम हा सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत शोभायात्रा, स.११ ते १२ उद्घाटन व स्वागत समारंभ, दुपारी १२ ते ३ प्रबोधन, दु.३ ते ४ भोजन, दु.४ ते सायं.८ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व सायं.८ ते रात्री१० वाजेपर्यंत बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम राहील. या कार्यक्रमामध्ये आदिवासींच्या संविधानावरील हक्क अधिकाराच्या प्रबोधना नंतर आदिवासी नृत्य यांची खुली स्पर्धा आयोजित केलेली आहेत. यात सामूहिक आदिवासी नृत्य व एकल नृत्य अशा पद्धतीच्या नृत्य स्पर्धा होईल. सामूहिक आदिवासी नृत्यासाठी पहिले बक्षीस ३००१, दुसरे बक्षीस २००१ ,तिसरे बक्षीस १००१ व एकल नृत्यासाठी पहिले बक्षीस १००१, दुसरे बक्षीस ७०१, तिसरे बक्षीस ५०१, या प्रमाणे विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण केल्या जाईल. या कार्यक्रमाला समस्त बिरसा ब्रिगेड पदाधिकारी,कार्यकर्ते ,समस्त मान्यवर, सदस्य, समाजबांधव व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद चंद्रभान कुळमेथे ,प्रदेश संघटक प्रा.वसंत कनाके, तालुका संपर्कप्रमुख उमेश येरमे, तालुकाध्यक्ष प्रमोद ईरपाते, सुरज मरस्कोल्हे, विनोद उईके, रोशन घोडाम, दिनेश मडावी, अल्केश कन्नाके, बादल जुमनाके, महेश सोयाम, निकेश कन्नाके, किशोर कंगाले ,सुनील मेश्राम, महादेव मेश्राम, समीर वळे,दिनेश करपते,अविनाश कुळसंगे, योगेश अरके, पांडुरंग सराटे, अजाबराव कोरांगे,माधुरीताई अंजिकर, विद्या परचाके,ज्योती कुळमेथे,गजानन उईके ,गणेश घोडाम, संजय आत्राम,नितीन कोहचाडे, नंदू मडावी, संजय घोडाम, कुंदन कुमरे,अमोल वेट्टी,नितीन मडावी,सुनील धुर्वे, पावन वड्डे ,प्रमोद वट्टे आदींनी केले आहे.