सामाजिक वनीकरण राळेगाव तर्फे वन महोत्सव संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तहसील कार्यालय राळेगाव येथे दिनांक 5 जुलै रोजी सामाजिक वनीकरण विभाग राळेगाव व न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव साजरा करण्यात आला. “झाडें लावा झाडे जगवा” असा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय राळेगावच्या परिसरात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वृक्ष भेट देण्यात आले. ज्या नागरिकांना वृक्ष लावण्यासाठी झाडांची आवश्यकता असेल अशा व्यक्तींकडून फॉर्म भरून वृक्ष मोफत देण्यात येईल असे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी या प्रसंगी दिले.
सदर कार्यक्रमाला राळेगाव चे उपविभागीय अधिकारी पाटील साहेब, राळेगाव तहसील चे तहसीलदार अमित भोईटे साहेब, नायब तहसीलदार पांडे साहेब, राळेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. गुंडकवार, गोपाल बुरले राष्ट्रीय हरित सेना न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव. धीरज चव्हाण वनपाल सतीश गाडगे निकेश गायवान लिपिक वनविभाग राळेगाव तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते